Friday, April 20, 2007

नातं..

देण्या-घेण्याला काही,
राहिलं नाही.
सांगाया-बोलाया काही
उरलं नाही,
बहराया-फ़ुलाया काही
मुरलं नाही,
दुखलं-जळलं कितीही मन मात्र,
तुटलं नाही,
तुझं-माझं नातं काही केल्या,
सरलं नाही..