Wednesday, November 7, 2012

"थेंब"


ओल्या तुझ्या केसातुन
एक थेंब निथळला,
गोरयापान तुझ्या पाठीवरुन 
हळुवार तो घरंगळला
पण अर्ध्या वाटेतच
अलगद तो थांबला,
तुझी पाठ सुटतच नाही
अस तो देखील म्हणाला !!

गंध !



मनाच्या माझ्या गाभारयात
पडलाय संधीप्रकाश तुझा,
दरवळे चिरंतन त्यातुन
गंध मैत्रीचा तुझा !!

पहाट



तांबडं लेवुन आली,
प्रसन्न पहाट,
घेवुन संगे
नीळाईचा धुसर ललाट..

पर्याय..



कधी कधी असं वाटतं कि,
समुद्र किनारयावर मी उभा,
अन एक समुद्राची मोठी लाट 
अंगावर यावी तशी तु येते्स,
क्षणभरात विळखा घालुन
तु आत ऒढत नेतेस,
शुध्द हरपुन गेली की,
पुन्हा तु किनारयावर सोडतेस,
शुध्दीवर पुन्हा मी यावं,अन
पुन्हा तु लगेच ओढुन न्यावं,
तुझ्या या स्वभावाला काय करावं?
तु दमण्याची अशी काय चिन्हं
पण दिसत नाहीत, अन
माझ्या सुटण्याच्या काही
आशा तर बिलकुल नाहीत.
अशा वेळेस तुला शरण जाण्या-
शिवाय मला काही पर्याय नाही

मोगरा..

मिठीत माझ्या शिरलिस
तु केव्हा, हे समजलेच
नाही मला,
केसांत तुझ्या चांदण्या
उतरल्या केव्हा, हे कळले
नाही मला,
मोगरा माझ्या दुलईत
पसरला केव्हा, हे गमले
नाही मला,
स्वप्ना मधुन दिवस 
उगवला केव्हा, हे उमजले
नाही मला......

भेद..



माझ्यातील "तुला" मी दररोज
ठार मारत असते.
कारण काळजातुन मेंदुकडे
जायचा रोजचा तुझा डाव असतो..
पण रोज मारुनही तु
दररोज उगवत असतोस..
आणि हल्ली तर तु खुप
निगरगट्ट झालायस.
विक्रमादित्याच्या वेताळाप्रमाणॆ 
तु मानगुटीवर
बसतोस..
आणि नको ते प्रश्न मला
विचारत असतोस..
पण काही झालं तरी
मारणारच रोज मी तुला..
नाही तर गळुन पडेल भेद
चेहरा अन मुखवटयातला..