Saturday, April 14, 2007

नटश्रावण

वैशाख वणव्यात मज
नटश्रावण दिसला,
घननीळ गहिरा गा
आर्त गहिवरला,
काळीजवेळी का कातर
पाझर हा फ़ुटला,
तव म्रुदगंध मदमस्त
मंद सा सुटला,
पतितप्रेमपवनाला पुन:
मार्गारव गा सुचला,
शापितश्वासाचा श्वास
सहज तव चुकला,
मज आज पुन्हा
तु दिसला!!!
पुन्हा तु दिसला!!

No comments: