आभाळ भरुन आलं की
सुरवातीला मस्त वाटतं,
पण जसे मळभ अधिक गडद
व
दाट होत जातात,
तस काळीज पण जड
होत जातं..
मग सुरु होते एक घुसमट.
कधी कधी ती जीवघेणी
वाटती,
मळभाचे थर कधी एकदा
रिक्त होतात,
अन कधी एकदा काळिज
हलकं होइल
याचीच वाट पाहणं आपल्या
हातात उरतं,
पण कधी हा प्रवास सुध्द्दा
प्रत्ययकारी अनुभव देवुन जातो,
व मळ्भाशी आपली नाळ
आणखी घट्ट करुन जातो,
मग प्रत्येक वेळेस
जेव्हा मळभ दाटुन येतात,
ही नाळ तुमच अस्तित्व
आणखी जिवंत करुन सोडतात..
काळया गर्द मळभामधुन
धो धो पाउस कोसळावा,
अन सारया आसमंताने
फ़क्त त्याचेच गाणे ऎकावे..
मग धुवुन जातात आठवणी..
फ़क्त तुर्तास..
पण खुणा मात्र तशाच
उरतात.
पाउस सुध्दा हे एक
निमित्तच,
आठवणि पुसुन टाकण्याकरता,
अन कधी कधी आसवं गाळण्याकरता,
कारण पाउसाच्या थेंबात
तुमची आसवं विरघळुन जातात चेहरयावर,
पण शेवटी पाउस हवाच..
कोसळुन सर्व शांत झालं
की,
मनालाही थंड करणारा
गारठा आणतो तो सोबत,
झाडांची पानगळ करुन
देतो मोफ़त,
मग सुक्या पानांबरोबर
ओल्य़ा पानांनाही नेतो
बरोबर..
आठवणिंचही असच असत,
जळाल्या की सर्व एक
साथ जळतात,
काही ठेवत नाहीत शिल्लक..
पानांच्या पानगळि बरोबर
काटक्या-कुटक्या,
छॊट्या फ़ांद्या सर्वांचा
मस्त सडा पडतो जमिनीवर,
त्यातुन मार्ग काढत
निघत,
पावसाच्या खुंणाच पाणी..
पानगळीबरोबरच संपुन
जाते
सर्व मरगळ..
एक फ़्रेशनेस येतो
वातावरणात,
आता पुढची वेळ असते
पालवी फ़ुटण्याची..
झाडाला, काळजाला..
नात्याला...
काहि झालं तरी म्हनुन
पाउस
हवाच.
....
No comments:
Post a Comment