Wednesday, November 7, 2012

भेद..



माझ्यातील "तुला" मी दररोज
ठार मारत असते.
कारण काळजातुन मेंदुकडे
जायचा रोजचा तुझा डाव असतो..
पण रोज मारुनही तु
दररोज उगवत असतोस..
आणि हल्ली तर तु खुप
निगरगट्ट झालायस.
विक्रमादित्याच्या वेताळाप्रमाणॆ 
तु मानगुटीवर
बसतोस..
आणि नको ते प्रश्न मला
विचारत असतोस..
पण काही झालं तरी
मारणारच रोज मी तुला..
नाही तर गळुन पडेल भेद
चेहरा अन मुखवटयातला..

No comments: