काही नाती जन्मत: मिळतात,
तर काही बनतात,
आपोआप..
नकळतपणे..
काही उसवत जातात,
आपोआप.
काही विणली जातात..
जाणिवपुर्वक..
प्रत्येक नात्याला
नाव असायला हवं,
अस समाजाच म्हननं असतं,
मग बिन नावाची नाती
का असु नयेत?
त्यात बिघडलं काय?
बिन बापाची मुलं समाजात
असतातच ना..
मग बिन नावाची नाती
का असु नयेत?
का ही पळ्वाट असते
समाजापासुन?
फ़सवणुक असते स्वताची?
नाव द्यायला घाबरतो
आपण?
अस काय दडुन बसलय नात्यात?
रक्ताची नाती कमी पडतात
तेथुन उगम पावतात,
बहुतांश नवीन नाती..
या नात्यांचा रंग कसा
असतो,
अगदी मस्त गहिरे..
बेमालुमपणे मिसळलेले
असतात.
सर्व अंश..
जेव्हढे पाहिजे तेव्हढे..
पण रंगाचा बेरंग व्हायला
वेळ
लागत नाही नात्यात..
कारण त्याचे आधार असतात
मानवी स्वभावाचे पाणीदार
बिंदु..
हे बिंदु जेव्हढे चंचल,
तेव्हढंच नातं राहतं
लवचिक..
हे बिंदुच सारे खेळ
करत असतात..
काही नकळत,
तर काही मुद्दाम..
कधी स्वतालाच धोका
देतात,
तर कधी फ़ितुर होतात,
कधी निष्ठावान बनतात,
जन्मभर..
काही प्रेमळ असतात,
तर तेव्ह्ढेच क्रुर.
कठोर..
प्रेमाचे नाती..
असं म्हणतात ती नाजुक
असतात,
कोण जाणे?
मग बाकीची का नाजुक
नसतात?
त्यांचा हॄदयाशी संबंध
जास्ती पडतो म्हनुन?
नात्याच्य़ा जंजाळातुन
कुणाची सुटका नाही.
कधी नात्याचा कुणि
भुकेला असतो,
तर कुणाला ती जड वाटतात,
कुणाला ती नकोशी असतात..
पण जन्मापासुन-मॄत्यु
पर्यंत ती साथसंगत मात्र करतात,
अगदी यथायोग्य पध्दतीने..
साला अॅरिस्टॅटल खरच
हुषार मानुस,
त्याने अगोदरच ओळखलं
सगळं..
किंबहुना ते सत्य होतच
आधीपासुन,
त्याने ते जगाला सांगीतलं.
नात्यापासुन..
नात्यापर्यंत..
माझी धाव
नात्याएव्हढीच.