खुपदा वाटतं की खुप काही लिहावं
पण लिहायला घेतलं की वाटतं,
शब्दच गोठले आहेत,
आणि अर्थ थिजले आहेत,
मग लिहायचा अट्टाहास तरी कशासाठी?
अशावेळी स्वप्नातील चांदण्या तशाच कोंदल्या जातात
तुज़्या प्रच्छ्न्न आठवणींच्या विळख्य़ामध्ये,
त्यातील काही अडकतात,
तर काही निसटतात..
अलगदपणे...
आणि पुन्हा सुरु होतात माझे स्त्राव
आशयातुन शब्दांकडे
तुझ्या आठवणींना वितळवन्यासाठी..
आणि सुरुवात होते एका न थांबणारया चक्राची...
Friday, April 13, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment