आताशा माझ्या "चुप्प" बसण्याचा
फ़ायदा किरकोळ "प्रश्न" ही घेत असतात,
आणि जाताना त्यांच्या सोयीने
"उत्तरं" ही जबरदस्तीने नेत असतात.
तुझ्यातील कातळाचा प्रस्तरभंग होण्याचा
माझी ’पाझरमाया" वाट बघत्येय,
परंतु सदैव तुझ्या मर्जीतील नियती
माझ्या प्रारब्धाची वाट रोकत्येय..
Friday, April 13, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment