Friday, April 27, 2007

तु..

गर्द आठवणींच्या बेधुंद धुक्यात
पुन्हा स्वतःला हरवून द्यावं,
अवचित यावी निबिड नभातुन
कवेत अलगद उचलुन घ्यावं,
मिठीत तुझ्या माझे ’मी’पण
भेद सर्व वितळुन जावं,
सुगंधी आरक्त श्वासांत तुझ्या
श्वासाला माझ्या प्रसवुन द्यावं,
पुनित प्रसन्न प्राक्तनात तुझ्या
स्वतःला घट्ट कॊंदवुन घ्यावं,
बेरंग अशा अचल प्रारब्धास
हलकेच तु ढवळून द्यावं,
स्वप्नात माझ्या हलकेच येउन
गुपचुप तु उठवुन द्याव....

No comments: