Friday, November 9, 2012

नाती..



काही नाती जन्मत: मिळतात,
तर काही बनतात,
आपोआप..
नकळतपणे..
काही उसवत जातात,
आपोआप.
काही विणली जातात..
जाणिवपुर्वक..
प्रत्येक नात्याला नाव असायला हवं,
अस समाजाच म्हननं असतं,
मग बिन नावाची नाती का असु नयेत?
त्यात बिघडलं काय?
बिन बापाची मुलं समाजात असतातच ना..
मग बिन नावाची नाती का असु नयेत?
का ही पळ्वाट असते समाजापासुन?
फ़सवणुक असते स्वताची?
नाव द्यायला घाबरतो आपण?
अस काय दडुन बसलय नात्यात?
रक्ताची नाती कमी पडतात
तेथुन उगम पावतात,
बहुतांश नवीन नाती..
या नात्यांचा रंग कसा असतो,
अगदी मस्त गहिरे..
बेमालुमपणे मिसळलेले असतात.
सर्व अंश..
जेव्हढे पाहिजे तेव्हढे..
पण रंगाचा बेरंग व्हायला वेळ
लागत नाही नात्यात..
कारण त्याचे आधार असतात
मानवी स्वभावाचे पाणीदार बिंदु..
हे बिंदु जेव्हढे चंचल,
तेव्हढंच नातं राहतं लवचिक..
हे बिंदुच सारे खेळ करत असतात..
काही नकळत,
तर काही मुद्दाम..
कधी स्वतालाच धोका देतात,
तर कधी फ़ितुर होतात,
कधी निष्ठावान बनतात,
जन्मभर..
काही प्रेमळ असतात,
तर तेव्ह्ढेच क्रुर.
कठोर..
प्रेमाचे नाती..
असं म्हणतात ती नाजुक असतात,
कोण जाणे?
मग बाकीची का नाजुक नसतात?
त्यांचा हॄदयाशी संबंध जास्ती पडतो म्हनुन?
नात्याच्य़ा जंजाळातुन कुणाची सुटका नाही.
कधी नात्याचा कुणि भुकेला असतो,
तर कुणाला ती जड वाटतात,
कुणाला ती नकोशी असतात..
पण जन्मापासुन-मॄत्यु पर्यंत ती साथसंगत मात्र करतात,
अगदी यथायोग्य पध्दतीने..
साला अॅरिस्टॅटल खरच हुषार मानुस,
त्याने अगोदरच ओळखलं सगळं..
किंबहुना ते सत्य होतच आधीपासुन,
त्याने ते जगाला सांगीतलं.
नात्यापासुन..
नात्यापर्यंत..
माझी धाव
नात्याएव्हढीच.

पाउस...


आभाळ भरुन आलं की
सुरवातीला मस्त वाटतं,
पण जसे मळभ अधिक गडद व
दाट होत जातात,
तस काळीज पण जड
होत जातं..
मग सुरु होते एक घुसमट.
कधी कधी ती जीवघेणी वाटती,
मळभाचे थर कधी एकदा रिक्त होतात,
अन कधी एकदा काळिज हलकं होइल
याचीच वाट पाहणं आपल्या हातात उरतं,
पण कधी हा प्रवास सुध्द्दा प्रत्ययकारी अनुभव देवुन जातो,
व मळ्भाशी आपली नाळ आणखी घट्ट करुन जातो,
मग प्रत्येक वेळेस जेव्हा मळभ दाटुन येतात,
ही नाळ तुमच अस्तित्व आणखी जिवंत करुन सोडतात..
काळया गर्द मळभामधुन धो धो पाउस कोसळावा,
अन सारया आसमंताने फ़क्त त्याचेच गाणे ऎकावे..
मग धुवुन जातात आठवणी..
फ़क्त तुर्तास..
पण खुणा मात्र तशाच उरतात.
पाउस सुध्दा हे एक निमित्तच,
आठवणि पुसुन टाकण्याकरता,
अन कधी कधी आसवं गाळण्याकरता,
कारण पाउसाच्या थेंबात तुमची आसवं विरघळुन जातात चेहरयावर,
पण शेवटी पाउस हवाच..
कोसळुन सर्व शांत झालं की,
मनालाही थंड करणारा गारठा आणतो तो सोबत,
झाडांची पानगळ करुन देतो मोफ़त,
मग सुक्या पानांबरोबर
ओल्य़ा पानांनाही नेतो बरोबर..
आठवणिंचही असच असत,
जळाल्या की सर्व एक साथ जळतात,
काही ठेवत नाहीत शिल्लक..
पानांच्या पानगळि बरोबर काटक्या-कुटक्या,
छॊट्या फ़ांद्या सर्वांचा मस्त सडा पडतो जमिनीवर,
त्यातुन मार्ग काढत निघत,
पावसाच्या खुंणाच पाणी..
पानगळीबरोबरच संपुन जाते
सर्व मरगळ..
एक फ़्रेशनेस येतो वातावरणात,
आता पुढची वेळ असते
पालवी फ़ुटण्याची..
झाडाला, काळजाला..
नात्याला...
काहि झालं तरी म्हनुन पाउस
हवाच.
....

Wednesday, November 7, 2012

"थेंब"


ओल्या तुझ्या केसातुन
एक थेंब निथळला,
गोरयापान तुझ्या पाठीवरुन 
हळुवार तो घरंगळला
पण अर्ध्या वाटेतच
अलगद तो थांबला,
तुझी पाठ सुटतच नाही
अस तो देखील म्हणाला !!

गंध !



मनाच्या माझ्या गाभारयात
पडलाय संधीप्रकाश तुझा,
दरवळे चिरंतन त्यातुन
गंध मैत्रीचा तुझा !!

पहाट



तांबडं लेवुन आली,
प्रसन्न पहाट,
घेवुन संगे
नीळाईचा धुसर ललाट..

पर्याय..



कधी कधी असं वाटतं कि,
समुद्र किनारयावर मी उभा,
अन एक समुद्राची मोठी लाट 
अंगावर यावी तशी तु येते्स,
क्षणभरात विळखा घालुन
तु आत ऒढत नेतेस,
शुध्द हरपुन गेली की,
पुन्हा तु किनारयावर सोडतेस,
शुध्दीवर पुन्हा मी यावं,अन
पुन्हा तु लगेच ओढुन न्यावं,
तुझ्या या स्वभावाला काय करावं?
तु दमण्याची अशी काय चिन्हं
पण दिसत नाहीत, अन
माझ्या सुटण्याच्या काही
आशा तर बिलकुल नाहीत.
अशा वेळेस तुला शरण जाण्या-
शिवाय मला काही पर्याय नाही

मोगरा..

मिठीत माझ्या शिरलिस
तु केव्हा, हे समजलेच
नाही मला,
केसांत तुझ्या चांदण्या
उतरल्या केव्हा, हे कळले
नाही मला,
मोगरा माझ्या दुलईत
पसरला केव्हा, हे गमले
नाही मला,
स्वप्ना मधुन दिवस 
उगवला केव्हा, हे उमजले
नाही मला......

भेद..



माझ्यातील "तुला" मी दररोज
ठार मारत असते.
कारण काळजातुन मेंदुकडे
जायचा रोजचा तुझा डाव असतो..
पण रोज मारुनही तु
दररोज उगवत असतोस..
आणि हल्ली तर तु खुप
निगरगट्ट झालायस.
विक्रमादित्याच्या वेताळाप्रमाणॆ 
तु मानगुटीवर
बसतोस..
आणि नको ते प्रश्न मला
विचारत असतोस..
पण काही झालं तरी
मारणारच रोज मी तुला..
नाही तर गळुन पडेल भेद
चेहरा अन मुखवटयातला..

Monday, November 5, 2012

जॅकेट..


गोठवणारया रात्रीच्या थंडीत
कार माझी सिग्नलवर उभी होती
समोर गाडयांची रांग तर
बाहेर धुक्याची खुमारी होती,
माझ्या जॅकेटची चेन 
आणखी वर ओढली,
तेवढयात काचेवर टकटक झाली,
एक इवल्याशा हाताची बोटं दिसली.
थोडी मान वर केली,
तर फ़ाटक्या चड्डीतील उघडी चिमुकली दिसली.
माझ्या जॅकेटची चेन
होती तिथेच अडकली.
तिच्या नाकातुन थंडीने
शेंबडाची धार लागली होती.
चेहरा निर्विकार तर
कटोरयात दोन-चार नाणी होती.
गारठयाने ती पार आखडुन गेली होती
नजरेने मात्र ती काही तरी शोधत होती.
माझा हात ट्राउसर मधील पर्सकडे
आपोआप वळला,
पण तेवढयात सिग्नलचा दिवा
लालवरुन हिरवा झाला.
मागुन कर्णकर्कश्य हॉर्न वाजले,
हातातले पैसे तिथेच राहिले,
गाडी स्टार्ट झाली,
माझ्या बॅकमिरर मध्ये मात्र
तिचे शोधक डोळे उमटले होते
कायमचे..
माझ्या अंगावरच जॅकेट मात्र
आता खुप अवजड वाटू लागल होतं,
मी ते फ़ेकून दिलं..
कायमचच !!